Konkan: रत्नागिरीतील आरे वारे समुद्रकिनारा - निसर्गाने बहाल केलेला खजिना!

Pranali Kodre

आरे वारे समुद्र किनारा

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे जवळ आरे वारे समुद्र किनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावर मिळणारी शांतता न विसरण्यासारखी आहे.

Aare Ware Beach, Ratnagiri

|

X/maha_tourism

डोंगराने विभागलेले दोन किनारे

येथे डोंगराने विभागलेले आरे आणि वारे हे दोन किनारे, नेत्रदीपक सूर्यास्त आणि निवांत वातावरण अनुभवायला मिळते.

Aare Ware Beach, Ratnagiri

|

X/maha_tourism

शांत, संयमी लाटा अन् स्वच्छ वाळू

या समुद्रकिनाऱ्यांवरील शांत आणि संयमी लाटा, स्वच्छ वाळू तुम्हाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ताजेतवान करतात.

Aare Ware Beach, Ratnagiri

|

X/maha_tourism

शांतता

गणपतीपुळे आणि रत्नागिरीपासून काहीच अंतरावर असलेला आरे वारे समुद्र किनारा फेरफटका मारण्यासाठी, शांततेसाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात फोटो काढण्यासाठी अगदी योग्य ठिकाण आहे.

Aare Ware Beach, Ratnagiri

|

X/maha_tourism

‘ओव्हर द सी’ झिपलाइन

ज्यांना साहसी खेळ आवडतात, त्यांच्यासाठी ‘ओव्हर द सी’ झिपलाइन देखील आहे. ही झिपलाईन पक्ष्यासारखं समुद्रावर उडण्याची आणि अथांग निळाशार समुद्र सौंदर्य पाहण्याचा अनुभव देते.

Aare Ware Beach, Ratnagiri

|

X/maha_tourism

कसे जाल?

रत्नागिरी शहरापासून हा समुद्रकिनारा जवळच असून टॅक्सी किंवा खाजगी गाडीने येथे जाता येते. तसेच गणपतीपुळ्याहून तर ८ ते ११ किमी अंतरावरच असून या समुद्रकिनाऱ्यावर रिक्षा किंवा टॅक्सीने जाऊ शकतो.

Aare Ware Beach, Ratnagiri

|

X/maha_tourism

सुचनांचे करा पालन

दरम्यान, या भागात गर्दी कमी असली तरी पर्यटकांनी पाण्यात उतरताना सुचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. सुरक्षेच्या दृष्टीने वारे बीच अधिक योग्य आहे.

Aare Ware Beach, Ratnagiri

|

X/maha_tourism

गणपतीपुळे

आरे वारे समुद्रकिनाऱ्याला भेट देणार असाल, तर गणपतीपुळे येथील प्रसिद्ध मंदिरालाही भेट देऊन आशीर्वाद घेता येतो.

Ganpatipule, Ratnagiri

|

Sakal

Diveagar: सुवर्ण गणेश मंदिर अन् सुरक्षित समुद्रकिनारा! सुट्टीत फिरण्यासाठी परफेक्ट ठिकाण

Diveagar Tourism

|

Sakal

येथे क्लिक करा