Diveagar: सुवर्ण गणेश मंदिर अन् सुरक्षित समुद्रकिनारा! सुट्टीत फिरण्यासाठी परफेक्ट ठिकाण

Pranali Kodre

दिवेआगर

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यामधील दिवेआगर हे लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. दिवेआगरचा इतिहासही प्राचीन आहे.

Diveagar Tourism

|

Sakal

बाराही महिने गर्दी

दिवेआगर हे एक संपन्न गाव आहे. येथील सुरक्षित आणि शांत समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करतो. त्यामुळे येथे बाराही महिने गर्दी दिसून येते.

Diveagar Tourism

|

Sakal

सुवर्ण गणपती मंदिर

दिवेआगरमधील सुवर्ण गणपती मंदिरही प्रसिद्ध आहे. त्याचा इतिहासही रंजक आहे.

Diveagar Tourism

|

Sakal

इतिहास

जमिनीखाली मंदिराजवळील नारळाच्या बागेत सापडलेल्या तांब्याच्या पेटीत सोन्याची गणपती मुर्ती आणि दागिने होते.

Diveagar Tourism

|

Sakal

सोन्याची गणपती मुर्ती

सुवर्ण गणेश ही तीच मुर्ती आहे. या मुर्तीचे वजन साधारण एक किलोपेक्षा जास्त आहे. ही गणपतीची मुर्ती ३०० ते ४०० वर्षे जुनी असल्याचे अंदाज आहेत.

Diveagar Tourism

|

Sakal

दिवेआगरमधील इतर प्रसिद्ध मंदिरं

दिवेआगरमध्ये रुपनाराण हे विष्णूचे मंदिरही पाहण्यासारखे आहे. तसेच शंकराचे उत्तरेश्वर हे देखील एक मंदिर आहे.

Diveagar Tourism

|

v

अथांग समुद्रकिनारा

दिवेआगरला ४ ते ५ किमी समुद्रकिनारा लाभला आहे. येथील निसर्गसौदर्यही मन मोहून टाकणारे आहे. किनाऱ्यावर सुरू, केवडा अन् पोफळीची बने आहेत.

Diveagar Tourism

|

Sakal

मासळी बाजार

मासे खवय्यांसाठी भरडखोल आदगाव, दिधी या ठिकाणी मासळी बाजार भरतो.

Diveagar Tourism

|

Sakal

प्रवासाची सोय

दिवेआगरला खासगी वाहनाने किंवा एसटीनेही जाता येते. जवळचे रेल्वेस्थानक माणगाव असून जवळचे बसस्थानक श्रीवर्धन आहे.

Mangaon Railway Station

|

Sakal

पर्यटनासाठी गर्दी

उन्हाळ्यात किंवा सुट्टीच्या काळात येथे पर्यटनासाठी गर्दी होते, त्यामुळे आगाऊ बुकिंग करणे सोयीचे ठरते.

Diveagar Tourism

|

Sakal

Konkan: पापं धुऊन काढणारा 'धूतपापेश्वर, रत्नागिरीतील एक निसर्गरम्य ठिकाण

Dhootpapeshwar Temple, Ratnagiri

|

X/maha_tourism

येथे क्लिक करा