एबी डिविलियर्सची लव्हस्टोरी! ताजमहालसमोर प्रपोज अन्...

Pranali Kodre

एबी डिविलियर्स

दक्षिण आफ्रिकेचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सचा मोठा चाहतावर्ग भारतात आहे.

AB de Villiers Love Story | Instagram

अनेक मोठे विक्रम

१७ फेब्रुवारीला वाढदिवस साजरा करणाऱ्या डिविलियर्सने त्याच्या कारकि‍र्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत.

AB de Villiers Love Story | Instagram

लव्हस्टोरी

मैदानात क्रिकेटसोबत जशी त्याची सुंदर लव्हस्टोरी राहिली, तशीच मैदानाबाहेर आत्ता त्याची पत्नी असलेल्या डॅनिएल हिच्यासोबतची लव्हस्टोरी आहे.

AB de Villiers Love Story | Instagram

पहिली भेट

डॅनिएलच्या आई-वडिलांचे लिम्पोपो येथे हॉटेल आहे. तिथे २००७ साली हे दोघे पहिल्यांदा भेटले. एबीडीला डॅनिएल पाहिल्यावर आवडली होती, पण त्याने त्याबद्दल तिला लगेच सांगितले नाही.

AB de Villiers Love Story | Instagram

गाणं ऐकून भारावला

त्यानंतर एबीडीच्या भावाच्या लग्नात हे दोघे भेटले. त्यावेळी डॅनिएलचे गाणे ऐकून एबी डिविलियर्स भारावला होता.

AB de Villiers Love Story | Instagram

मैत्रीचे प्रेमात रुपांतर

हळुहळू मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. पण त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाले ते भारतात.

AB de Villiers Love Story | Instagram

सरप्राईज

डिविलियर्सने डॅनिएलसाठी भारतात एक सरप्राईज प्लॅन केला. तो तिला घेऊन ताज महालला गेला, त्याने तिथे फोटोग्राफर्सला सुरक्षारक्षक म्हणून नेले होते.

AB de Villiers Love Story | Instagram

लग्नाची मागणी

त्यानंतर डिविलियर्सने डॅनिएलला ताज महालसमोर लग्नाची मागणी घातली.

AB de Villiers Love Story | Instagram

लग्न

यानंतर त्यांनी २०१३ मध्ये पहिल्यांदा भेटले, त्याच हॉटेलमध्ये लग्न केले.

AB de Villiers Love Story | Instagram

मुलं

आता डिविलियर्स आणि डॅनिएल यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे.

AB de Villiers Love Story | Instagram

Ed Sheeran चा टीम इंडियाची जर्सी घालून लाईव्ह परफॉर्मन्स

Ed Sheeran | Sakal
येथे क्लिक करा