Pranali Kodre
हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक एड शीरन सध्या भारत दौऱ्यावर होता.
यादरम्यान त्याने दौऱ्याच्या शेवटी भारतीयांची मनं जिंकली आहेत.
त्याने त्याच्या दौऱ्यातील शेवटचा परफॉर्मन्स गुरुग्राममध्ये केला.
त्याच्या गुरुग्राममधील शोसाठीही चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या शोदरम्यान, शीरननेही सर्वांना खूश केले. त्याने स्टेजवर भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालत परफॉर्म केले.
त्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाची लाट पसरली होती. त्याला भारतीय संघाच्या जर्सीत पाहून चाहत्यांनी मोठ्याने त्याला चिअरही केले.
एड शीरन याचा भारतातही मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे त्याच्या शोला चाहत्यांची मोठी गर्दी होत असते.