ओटीपोटातील वेदना वाढतायत? ‘हे’ असू शकते गंभीर आजारांचे लक्षण!

Aarti Badade

पोटदुखीकडे दुर्लक्ष नको

अनेकदा आपण ओटीपोटात होणाऱ्या वेदनांकडे गॅस किंवा थकवा म्हणून दुर्लक्ष करतो, पण हे शरीरातील अंतर्गत आजाराचे संकेत असू शकतात.

कोणती लक्षणे आहेत धोक्याची?

वेदनेसोबतच छातीत जळजळ, उलट्या, भूक न लागणे, सततचा अतिसार किंवा बद्धकोष्ठता जाणवत असल्यास सावध व्हावे.

Lower abdomen pain causes

|

Sakal

पचनसंस्थेशी संबंधित आजार

ओटीपोटात वारंवार दुखणे हे 'इरिटेबल बाऊल सिंड्रोम' (IBS) किंवा 'इन्फ्लेमेटरी बाऊल डिसीज' (IBD) चे लक्षण असू शकते.

Lower abdomen pain causes

|

Sakal

किडनी आणि पित्ताशयाचे खडे

मुतखडा (Kidney Stones) किंवा पित्ताशयातील खडे (Gallstones) यामुळे देखील ओटीपोटात तीव्र कळा येऊ शकतात.

Lower abdomen pain causes

|

sakal

अ‍ॅपेंडिसायटिसचा धोका

जर वेदना पोटाच्या उजव्या बाजूला खाली सरकत असतील, तर ते अ‍ॅपेंडिसायटिसचे लक्षण असू शकते, ज्यावर त्वरित उपचार आवश्यक असतात.

Lower abdomen pain causes

|

Sakal

महिलांमधील विशेष समस्या

महिलांमध्ये मासिक पाळीतील अडचणी, ओव्हेरियन सिस्ट किंवा गर्भाशयाशी संबंधित समस्यांमुळे ओटीपोटात सतत दुखू शकते.

Lower abdomen pain causes

|

Sakal

मूत्रमार्ग संसर्ग (UTI)

लघवी करताना जळजळ होणे आणि ओटीपोटात जडपणा जाणवणे हे 'युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन'चे लक्षण असू शकते.

Lower abdomen pain causes

|

Sakal

खाण्यापिण्याच्या सवयी

वारंवार होणारी पोटदुखी टाळण्यासाठी तळलेले, मसालेदार पदार्थ कमी खावेत आणि जेवण नेहमी वेळेवर करावे.

Lower abdomen pain causes

|

Sakal

तणाव आणि व्यायाम

जास्त चिंता आणि मानसिक तणावामुळे पचनावर परिणाम होतो; यासाठी दररोज योगासने आणि हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरते.

Lower abdomen pain causes

|

Sakal

डॉक्टरांचा सल्ला

जर अचानक वजन कमी होत असेल, उलट्या होत असतील किंवा वेदना तीव्र असतील, तर घरगुती उपाय न करता त्वरित तज्ज्ञांना भेटावे.

Lower abdomen pain causes

|

Sakal

कोलेस्टेरॉल वाढलंय? हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'ही' टेस्ट नक्की करा

Lipid profile test cholesterol for a healthy heart

|

Sakal

येथे क्लिक करा