kimaya narayan
मराठी मालिका, सिनेमा आणि नाटक यांमधून अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर.
अभिजीत सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्याची विविध कामं तो सोशल मीडियावर शेअर करतो.
सध्या अभिजीत केळकर आज्जीबाई जोरात या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पुष्कर श्रोत्रीने साकारलेली भूमिका तो आता नाटकात साकारतोय.
त्याचा आणि त्याच्या मुलांचा बॉण्डही प्रेक्षकांना खूप आवडतो.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये अभिजीत लेकीच्या वेण्या घालताना दिसतोय.
त्याने या व्हिडिओला "आई ऑफिसला जाते तेव्हा आम्ही" असं कॅप्शन दिलं आहे.
अनेकांनी कमेंट करत अभिजीतचं कौतुक केलं. "असा नवरा आणि बाप प्रत्येकाला मिळो" अशी कमेंट अनेकांनी या व्हिडिओवर केली आहे.