kimaya narayan
काल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सेमी फायनल सामना भारताने जिंकला. त्यानंतर बॉलिवूड कलाकार आणि मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं.
अभिनेते अनुपम खेर यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर भारत माता कि जय ! असं ट्विट करत टीमचं अभिनंदन केलं.
"या उत्तम विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन आणि अंतिम मॅचसाठी शुभेच्छा" असं ट्विट अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा एक्स या सोशल मीडियावर केलं आहे.
अभिनेता अजय देवगणने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली. "स्टाईलमध्ये फायनलमध्ये प्रवेश. 2023 पासून वाट पाहत असलेला बदला आम्ही घेतला आणि खूप छान पद्धतीने घेतला. चॅम्पियन्स बनण्यासाठी एक पाऊल पुढे."
के एल राहुलची पत्नी आणि अभिनेत्री अथिया शेट्टीने फायनल स्टेडियमचा फोटो टाकत लेट्स गो असं कॅप्शन दिलं आहे.
अभिनेता संजय कपूरने मॅचमधील व्हिडीओ शेअर करत टीमचं अभिनंदन केलं.
बिग बॉस मराठी सीजन 5 फेम निखिल दामलेने विजयी क्षणाचा फोटो शेअर करत टीमचं अभिनंदन केलं.
अभिनेत्री सोहा अली खानने विजयी क्षणाचा व्हिडीओ शेअर करत 'हे अशा तऱ्हेने केलं' असं म्हणत टीमचं अभिनंदन केलं.
मराठी अभिनेता सिद्धार्थ खिरीड यांनी विजयी क्षण शेअर करत टीमचं अभिनंदन केलं.
शिवा फेम अभिनेत्री पूर्वा कौशिकने शूटिंगच्या वेळी क्रू पाहत असलेल्या मॅचचा व्हिडीओ शेअर करत जिंकलो भाई जिंकलो असं कॅप्शन दिलं आहे.
अभिनेता प्रथमेश परबने विनर असं टीम इंडियाचं पोस्टर शेअर करत अभिनंदन केलं.