Anuradha Vipat
अभिषेक बच्चनने नुकत्याच एका मुलाखतीत पत्नी ऐश्वर्या राय बच्चन बद्दल भावनिक वक्तव्य केलं आहे.
आता घटस्फोटाच्या सुरु असलेल्या या चर्चांमध्ये अभिषेकचे हे वक्तव्य महत्त्वाचे ठरत आहे.
एका मुलाखतीदरम्यान अभिषेकला आराध्य तसेच ऐश्वर्याबद्दल विचारलं असता त्याने आराध्याबरोबरच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे
तसेच यावेळी त्याने पत्नी ऐश्वर्या राय बच्चनचे आभारही मानले आहेत .
अभिषेक म्हणाला की, “मी नशीबवान आहे की मला बाहेर जाऊन चित्रपट करायला मिळतात
पुढे अभिषेक म्हणाला की, कारण मला माहीत आहे की ऐश्वर्या आराध्यासोबत घरी आहे आणि त्याबद्दल मी तिचे मनापासून आभार मानतो
तसेच पुढे तो म्हणाला “आई-बाबा झाल्यावर तुमची मुलं तुम्हाला खूप प्रेरणा देतात.