Anuradha Vipat
अभिषेक गावकर आणि सोशल मीडिया रील स्टार सोनाली गुरव यांचा लग्नसोहळा मालवणात थाटामाटात पार पडला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून यांच्या लग्नातले बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
तसेच सोनालीने लग्नानंतरचे काही सुंदर फोटो शेअर करत याच्या कॅप्शनमध्ये मिसेस वामिका अभिषेक गावकर असं नाव लिहिलं आहे
सोनालीने सासरी गेल्यावर प्रथेनुसार आपलं नाव बदललं आहे.
या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
आता अभिषेक आणि सोनाली साता जन्माचे सोबती झाले आहेत.
या दोघांचाही चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे