२३ वर्षीय अभिषेक शर्माचे दुसऱ्याच सामन्यात ४ मोठे विक्रम

प्रणाली कोद्रे

भारताचा विजय

भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात १०० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Team India | X/BCCI

शतकी खेळी

भारताच्या या विजयात अभिषेक शर्माने शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. त्याने ४६ चेंडूत शतक केले होते.

Abhishek Sharma | X/BCCI

अभिषेकचे शतक

अभिषेकने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ८ षटकारांसह १०० धावांची खेळी केली. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय शतकही ठरले. हे शतक त्याच्यासाठी विक्रमी ठरले.

Abhishek Sharma | X/BCCI

पहिला खेळाडू

अभिषेक झिम्बाब्वेविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये भारतासाठी शतक करणारा पहिलाच खेळाडू ठरला.

Abhishek Sharma | X/BCCI

पहिलं शतक

टी२० पदार्पणानंतर केवळ दुसऱ्याच डावात शतक करणाराही तो भारताचा पहिलाच खेळाडू आहे. यापूर्वी दीपक हुडाने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पणानंतर तिसऱ्या डावात, तर केएल राहुलने आंतरराष्ट्रीय चौथ्या डावात शतक केले होते.

Abhishek Sharma | X/BCCI

टी-२०मधील भारतासाठी वेगवान शतक

  • ३५ चेंडू - रोहित शर्मा (श्रीलंका)

  • ४५ चेंडू - सूर्यकुमार यादव (श्रीलंका)

  • ४६ चेंडू - के. एल. राहुल (वेस्ट इंडीज)

  • ४६ - अभिषेक शर्मा (झिम्बाब्वे)

Abhishek Sharma | X/BCCI

शतक झळकावणारा भारताचा युवा खेळाडू

  • यशस्वी जयस्वाल - २१ वर्षे २७९ दिवस

  • शुभमन गिल - २३ वर्षे १४६ दिवस

  • सुरेश रैना - २३ वर्षे १५६ दिवस

  • अभिषेक शर्मा - २३ वर्षे ३०७ दिवस

Abhishek Sharma | X/BCCI

'एकमेव आवडता व्यक्ती', जड्डूकडून धोनीला बड्डेच्या हटके शुभेच्छा

MS Dhoni - Ravindra Jadeja | Sakal