सकाळ डिजिटल टीम
भारतीय ट्वेंटी-२० संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ३४ चेंडूत ७९ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.
तर दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने एक विकेट देखील मिळवली.
अभिषेक शर्माच्या फलंदाजीमध्ये आपल्याला माजी क्रिकेटपटू युवराज सिंगची झलक पाहायला मिळते.
पण यावेळी त्याने आपल्या कोचचा म्हणजेच युवराज सिंगचा विक्रम मोडला आहे व कमी डावात सर्वाधिक ट्वेंटी-२० षटकार मारणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे.
अभिषेक शर्माने १२५ डावात २०० षटकार ठोकण्याचा विक्रम केला आहे व तो या यादीत अव्वल स्थानी आहे.
१४५ डावात २०० षटकार ठोकणारा केएल राहुल यादीत दुसऱ्या स्थानी आहे.
तिसऱ्या स्थानावर असलेल्या नितीश राणाने १४६ डावात ही कामगिरी केली आहे.
स्फोटक फलंदाज युवराज सिंगने २०० षटकार १४८ डावात पूर्ण केले होते व तो या यादीत चौथ्या स्थानी आहे.
पाचव्या स्थानी असलेला विकेटकीपर फलंदाज इशान किशनने ही कामगिरी १६६ डावात पूर्ण केली आहे.