Asia Cup मध्ये अभिषेक शर्माला गिफ्ट मिळालेल्या कारची किंमत माहितीये का?

Pranali Kodre

भारतीय संघाने जिंकला आशिया कप २०२५

आशिया कप २०२५ स्पर्धा भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ विकेट्सने पराभूत करत जिंकली.

Team India

|

Sakal

सर्वाधिक धावा

या संपूर्ण स्पर्धेत २५ वर्षीय अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

Abhishek Sharma

|

Sakal

अभिषेक शर्माच्या धावा

अभिषेकने या स्पर्धेत ७ सामन्यात ३ अर्धशतकांसह जवळपास २०० च्या स्ट्राईकरेटने ३१४ धावा ठोकल्या.

Abhishek Sharma

|

Sakal

मालिकावीर

त्यामुळे अभिषेक मालिकावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला. त्यासाठी त्याला रोख रक्कम आणि Haval H9 ही कार बक्षीस म्हणून मिळाली.

Abhishek Sharma

|

Sakal

कारची उंची, रुंदी

ही कार ७ सीटची असून ४,९५० मिमी, रुंदी १,९३० मिमी आणि उंची १, ९६० मिमी आहे. तसेच कारचा ग्राऊंड क्लिअरन्स २२४ मिमी असून गाडी ८०० मिमी खोलीपर्यंत पाण्यातून जाऊ शकते.

Abhishek Sharma | Haval H9 Car price and features

|

Sakal

इंजिन

या कारला २.० लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन असून २१४ bhp पॉवर आणि ३८० Nm टॉर्क निर्माण करते. तसेच ८ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि ४WD सिस्टीमसह हे इंजिन येते.

Abhishek Sharma | Haval H9 Car price and features

|

Sakal

कारमधील सुविधा

याशिवाय कारमध्ये व्हेंटिलेटेड व मसाज फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरुफ, वायरलेस चार्जिंग, टचस्क्रिन, स्पीकर अशा सुविधाही आहेत.

Abhishek Sharma | Haval H9 Car price and features

|

Sakal

सेफ्टी फिचर्स

तसेच सेफ्टी फिचर्समध्ये ६ एअरबॅग्स, ऍडॉप्टिव्ह क्रुज कंट्रोल, लेन किपिंग असिस्ट, ब्लाईंड-स्पॉट मॉनिटरिंग, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ३६० डिग्री कॅमेरा आहे.

Abhishek Sharma |  Haval H9 Car price and features

|

Sakal

कारची किंमत

Haval H9 या कारची आंतरराष्ट्रीय बाजारात साधारण ३०,००० अमेरिकन डॉलर्स (२६.६५ लाख) किमंत आहे.

Abhishek Sharma |  Haval H9 Car price and features

|

Sakal

Asia Cup जिंकणारे ६ भारतीय कर्णधार कोणते?

Suryakumar Yadav

|

Sakal

येथे क्लिक करा