Pranali Kodre
अभिषेक शर्माने आयपीएल २०२५ मध्ये १२ एप्रिल रोजी पंजाब किंग्सविरुद्ध दणदणीत शतक ठोकत सनरायझर्स हैदराबादला विजय मिळवून दिला.
हैदराबादकडून खेळताना अभिषेकने तब्बल १४ चौकार आणि १० षटकारांची बरसात करत ५५ चेंडूत १४१ धावांची खेळी साकारली.
त्याने केलेली १४१ धावांची खेळी ही आयपीएलमधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावांची खेळी ठरली आहे.
तसेच भारतीय खेळाडूने केलेली आयपीएलमधील सर्वोच्च धावांची खेळी ठरली आहे.
आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अभिषेक शर्माने केएल राहुलला मागे टाकले.
केएल राहुलने पंजाब किंग्ससाठी २०२० मध्ये रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध नाबाद १३२ धावा केल्या होत्या.
आयपीएलमध्ये सर्वोच्च धावांची खेळी करणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये अभिषेक शर्मा आणि केएल राहुलनंतर तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल आहे.
शुभमन गिलने गुजरात टायटन्ससाठी मुंबई इंडियन्सविरुद्ध २०२३ मध्ये अहमदाबादमध्ये १२९ धावांची खेळी केली होती.