Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही एक अशी स्पर्धा आहे, जिथे देशातील कानाकोपऱ्यातील प्रतिभाशाली खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळते.
आयपीएल २०२५ मध्येही असे काही युवा खेळाडू आहेत, ज्यांनी पहिल्या २७ सामन्यांत अनेकांना प्रभावित केले आहेत. अशाच ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
२३ वर्षीय साई सुदर्शन २०२२ पासून आयपीएल खेळत आहे, पण त्याला नियमितपणे संधी २०२४ पासून गुजरात टायटन्सने दिली. त्यानेही या संधीचे सोने केले आहे. त्याने २०२५ मध्ये ६ सामन्यांतच ४ अर्धशतकांसह ३२९ धावा केल्या आहेत.
२५ वर्षीय फिरकीपटू दिग्वेश राठीने आयपीएल २०२५ मधून लखनौ सुपर जायंट्ससाठी पदार्पण केले. त्याने ६ सामन्यातच ८ विकेट्स घेतल्या आहेत. यात तो आदर्श मानत असलेल्या सुनील नरेनच्या विकेटचाही समावेश आहे.
चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ३९ चेंडूतच प्रियांश आर्याने शतक झळकावले. याशिवाय देखील तो पंजाब किंग्ससाठी यावर्षी चांगली सुरुवात करून देताना दिसला आहे. २४ वर्षीय प्रियांश आर्याने ५ सामन्यांत १९४ धावा केल्या आहेत.
दिल्ली कॅपिटल्सक़डून आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण करणाऱ्या विपराज निगमने त्याच्या अष्टपैलू खेळासोबतच क्षेत्ररक्षणातही चमक दाखवली आहे. त्याने ४ सामन्यांत ५ विकेट्स घेतल्या आहेत, तर २३५.२९ च्या स्ट्राईक रेटने ४० धावा केल्या आहेत.
गेल्या दोन हंगामात फार संधी न मिळालेला साई किशोर यंदा गुजरात टायटन्सचा नियमित खेळाडू म्हणून खेळताना दिसतोय. २८ वर्षीय फिरकीपटू साई किशोरने ६ सामन्यात १० विकेट्स घेतल्या आहेत.