Monika Shinde
अभ्यंगस्नान म्हणजे तिळाचे किंवा सुगंधी तेल लावून पूर्ण शरीराचा मसाज करणे. नंतर उटणं लावून कोमट पाण्याने स्नान करतात.
२० ऑक्टोबर नरकचतुर्दशीचा दिवशी पहाटे ५:१३ ते ६:२५ या मुहूर्ता आहे.
नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्यानंतर त्यांनी केलेला मंगलस्नान म्हणजे अभ्यंगस्नानाची सुरूवात.
अभ्यंगस्नान हे पापांपासून मुक्ती देणारे आणि नरकातून वाचवणारे पवित्र स्नान मानले जाते.
दिवाळीच्या थंडीत त्वचा कोरडी होते. अभ्यंगस्नानाने तेल लावून कोमट पाण्याने स्नान केल्याने त्वचेला ओलावा आणि पोषण मिळते.
अभ्यंगस्नान केल्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंना आराम मिळतो आणि शरीरात नवी ऊर्जा होते.
अभ्यंगस्नानापूर्वी ‘कारीट’ नावाचं कडवट फळ पायाच्या अंगठ्याने फोडतात. याने वाईट गोष्टी नष्ट होतात आणि गोडव्याची सुरुवात होते.
फक्त दिवाळीच्या दिवशी नव्हे, तर वर्षभर दररोज अभ्यंगस्नान केल्याने त्वचा तजेलदार, स्नायू बलवान आणि रक्ताभिसरण चांगले राहते.
अभ्यंगस्नान केल्याने ताण कमी होतो, झोप सुधारते आणि शरीराला ताजेतवाने वाटते