दिवाळीची खरेदी असो किंवा लग्नसराई...सोलापुरातील 'हे' ठिकाण आहे सगळ्यांचा फेव्हरेट!

Monika Shinde

टिळक चौक

सोलापुरातील टिळक चौक हे लग्नसराईपासून ते दिवाळीची सर्व सणाच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला विविध वस्तू कमी किमतीत सहज मिळतात.

बाजारपेठ नेहमी गजबजलेली

इथे दिवाळी असो की अन्य कार्यक्रम, बाजारपेठ नेहमी गर्दीने भरलेली असते. कपडे, खाद्यपदार्थ आणि अनेक वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत.

बजेट-फ्रेंडली शॉपिंग

टिळक चौकात ५ रुपये पासून ते हजारो रुपयांपर्यंत विविध किंमतीच्या वस्तू मिळतात. त्यामुळे सामान्य माणसासाठी ही बाजारपेठ खास सोयीची आहे.

सणासुदीच्या आधी गर्दी वाढते

दिवाळीच्या सणासुदीच्या काळात लोकांची गर्दी खूप वाढते. प्रत्येकजण खास खरेदीसाठी आणि सणासाठी सजावट घेण्यासाठी येतो.

रंगीबेरंगी दिवाळीची सजावट

सध्या टिळक चौक दिवाळीच्या वस्तूने भरलेला आहे. रांगोळी, दिवे आणि भिंतींच्या सजावटीने बाजार सुंदर दिसतो.

फुलांचा बाजार

टिळक चौक ते कन्या चौक मधल्या मारुती चौकात फुलांच्या दुकानांची मोठी गर्दी असते. ताज्या फुलांमुळे बाजारात मनमोहक सुवास असतो.

सर्व सणांसाठी एक ठिकाण

टिळक चौकात लग्नसराईपासून दिवाळीपर्यंत सर्व सणांच्या गरजा पूर्ण होतात. प्रत्येकाला हवे ते सामान येथे सहज मिळते.

दिवाळीत उटणे का लावावे? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे

येथे क्लिक करा