Yashwant Kshirsagar
पावसाळा आणि हिवाळ्यानंतर आता एसी सुरू केला असेल तर आधी त्याची सर्व्हिसिंग करून घ्या.
उन्हाळा येण्याआधी तुम्ही तुमच्या एअर कंडिशनरची म्हणजेच एसीची सर्व्हिस केली तर ते तुमच्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते.
सर्विसिंग न केल्याने एसी निट चालत नाही. जरी तुम्हाला थंड हवा मिळाली तरी मग एसीमुळे तुमचं लाईटबिल मोठ्याप्रमाणात वाढते.
एसीच्या सर्व्हिसमध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर करु नये. यामुळे कॉइल खराब होऊ शकते. ज्यामुळे एसी कमकुवत होतो आणि गॅस लिकेज होऊ लागतो.
एसी जास्त काळ टिकावा यासाठी एसीची इंस्टॉलेशन अशा ठिकाणी असावं, जिथे एसीवर ऊन येणार नाही आणि धूळ मातीचा प्रभाव त्याच्या कूलिंग कॉइलवर कमीत कमी होईल.
स्वच्छ फिल्टर आणि योग्य देखभाल केलेली कॉइल एसीला कमी पॉवरमध्ये चांगले कूलिंग प्रदान करण्यात मदत करतात.
एसीच्या कुलिंगच्या कामासाठी एसीमधील गॅस तपासणे देखील गरजेचे आहे. एसीमध्ये योग्य प्रमाणात गॅस नसेल तर एसी खराब होऊ शकतो.