Yashwant Kshirsagar
उन्हाळा सुरु झाला आहे, शरीराला गारवा देण्यासाठी आपण कलिंगड खातो, पण कलिंगड खाल्ल्याने वजन देखील कमी होते, याशिवाय अनेक फायदे देखील आहेत.
कलिंगडामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते. त्यात सुमारे ९२ टक्के पाणी असते. एक प्लेट कलिंगड खाल्ल्याने आपले शरीर अधिक काळ हायड्रेट राहते.
कलिंगडामध्ये लाइकोपीन आढळते. लाइकोपीन खरंतर एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे शरीरातील चरबीची निर्मिती कमी करण्यास मदत करते.
कलिंगडामध्ये पाणी जास्त आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे कलिंगड खाल्ल्याने कॅलरीज वाढत नसून, कमी करण्यास मदत होते.
कलिंगडामध्ये फ्रक्टोज असते. जे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी न वाढवता, उर्जा प्रदान करते.
कलिंगडामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.
कलिंगड खाल्ल्याने वजन तर कमी होतेच, शिवाय पचनक्रियाही सुधारते, व पोटाचे विकार दूर राहतात.