Anushka Tapshalkar
शरीरातील सात चक्रे (संपूर्ण ऊर्जा केंद्रे) योग, आयुर्वेद, आणि अध्यात्मात महत्त्वाची मानली जातात. ही चक्रे शरीरातील विशिष्ट ठिकाणी असतात आणि प्रत्येक चक्र विशिष्ट ऊर्जा व भावनांशी जोडलेले असते.
मूलाधार चक्र पाठीच्या कण्याच्या तळाशी असते. मूलाधार चक्राला सक्रिय करण्यासाठी वृक्षासन फायदेशीर आहे. हे आसन शरीराला स्थिरता व आधार देते.
स्वाधिष्ठान चक्र नाभीखाली असते. स्वाधिष्ठान चक्रासाठी बद्धकोणासन उत्तम आसन आहे. हे आसन सर्जनशीलता वाढवते आणि नाभीखालच्या भागाला ऊर्जा प्रदान करते.
मणिपूर चक्र नाभीच्या वरच्या भागात असते. मणिपूर चक्राला सक्रिय करण्यासाठी नौकासन उपयुक्त आहे. हे आसन पोटाचे स्नायू मजबूत करते आणि आत्मविश्वास वाढवते.
हे चक्र हृदयाजवळ असते. अनाहत चक्रासाठी उष्ट्रासन प्रभावी आहे. हृदय उघडण्यासाठी व प्रेम व करुणा जागृत करण्यासाठी हे आसन मदत करते.
विशुद्ध चक्र घशात स्थित असून, या चक्राला सक्रिय करण्यासाठी मत्स्यासन योग्य आहे. हे घशातील ऊर्जा केंद्राला बळकट करते आणि संवाद सुधारते.
आज्ञा चक्र कपाळाच्या मध्यभागी, भुवयांच्या मध्ये असते. या चक्राला संतुलित ठेवण्यासाठी बालासन उपयुक्त आहे. या आसनामुळे मन शांत होते आणि अंतर्ज्ञान वाढते.
हे चक्र डोक्याच्या शिखरावर असते. सहस्रार चक्रासाठी शवासन सर्वोत्तम आहे. हे आसन शरीराला पूर्ण विश्रांती देते आणि आध्यात्मिक जागरूकता वाढवते.