Anushka Tapshalkar
गोमुखासन म्हणजे गाईच्या चेहऱ्यासारखी आसनस्थिती. हे खांदे, छाती आणि हिप लवचिक बनवणारे हठ योगातील प्रभावी आसन आहे.
हे आसन नियमित केल्याने आपल्याला पुढील आरोग्यदायी फायदे मिळतात, जे शरीर लवचिक आणि सुदृढ ठेवण्यास मदत करते.
गोमुखासनामुळे पाठीचा कणा आणि पाठीचा खालचा भाग ताणला जातो, ज्यामुळे सायटिकाशी संबंधित वेदना कमी होतात. स्नायूंना ताणून ते भविष्यातील त्रास टाळते.
गोमुखासन केल्यामुळे शरीर आणि मन शांत राहते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
गोमुखासन करताना संपूर्ण शरीराला ताण बसतो, त्यातही खांदे जास्त ताणले जातात. यामुळे खांद्यांचे स्नायू मोकळे होतात आणि त्यांचा ताठरपणा कमी होतो आणि लवचिकता वाढते.
दिवसभर बैठी काम केल्याने आणि चुकीच्या बसण्याच्या सवयीमुळे आपले पोश्चर बिघडते. या आसनामुळे शरीराचा पोश्चर सुधारतो आणि बिघडलेली शारीरिक ठेवणं व्यवस्थित राहते.
हे आसन करताना संपूर्ण शरीर ताणले जाते, ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे मेंदूला शांतता मिळते, परिणामी मानसिक ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते.
हे आसन करताना मांड्यांचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे शरीरातील रक्तसंचार (Blood Transfusion) सुधारते आणि किडनीच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो.
गोमुखासन करताना पाठ ताठ ठेवावी लागते ज्यामुळे पाठीचा कणा ताणून लांबवला जातो व सरळ होतो. त्यामुळे पाठीचे स्नायू बळकट होतात आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
गोमुखासन पेल्विक (Pelvic) किंवा ओटीपोटाच्या भागातील रक्तप्रवाह वाढवून पुनरुत्पादक अवयवांना उत्तेजित करते. तसेच कंबर आणि मांड्याना लवचिक बनवून तेथील ताण कमी करते. ज्यामुळे लैंगिक कार्यक्षमता सुधारते.
या आसनामुळे संपूर्ण शरीराच्या स्नायू जसे की, घोटे, मांड्या, खांदे, ट्रायसेप्स, छातीचे स्नायू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काखेच्या स्नायूंच्या लवचिकतेवर प्रभाव पडतो आणि ते अधिक मजबूत होतात.
तुम्हाला गुडघे, खांदे, मान, कंबर किंवा घोट्याच्या समस्या असल्यास गोमुखासन टाळावे, तसेच गर्भवती महिलांनी जास्त ताण देऊ नये. कोणतीही दुखापत किंवा आरोग्य समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय हे आसम करू नये.