Anuradha Vipat
गेल्या काही दिवसांपासून 'तू ही रे माझा मितवा' या आगामी मराठी मालिकेची चर्चा सुरू आहे.
या मालिकेच्या निमित्ताने तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता अभिजीत आमकर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे.
या मालिकेतून एक अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे
९ वर्षांपूर्वी अभिजीत आमकरने स्टार प्रवाहच्या अरे वेड्या मना मालिकेतून मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं
महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत पुन्हा एकदा जोडला जातोय याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे असं बोलताना अभिजीत आमकर म्हणाला आहे
तसेच या मालिकेतल्या माझ्या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आली आहे असंही बोलताना अभिजीत आमकर म्हणाला आहे
अभिजीत आमकर सोशल मिडीयावर सक्रिय असतो