kimaya narayan
सध्या सोशल मीडियावर मराठी अभिनेत्याचा मुलींचे कपडे घातलेला व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघून सगळ्यांनाच धक्का बसलाय.
हा अभिनेता आहे अजिंक्य राऊत. मराठी मालिकांमध्ये दमदार अभिनयाने सगळ्यांची मन जिंकणारा आणि मुलींचा लाडका चॉकलेट बॉय असलेल्या अजिंक्यने फ्रॉक घातलेले फोटो शेअर केले आहेत.
अजिंक्य सध्या अभिनयाच्या कार्यशाळेत हजेरी लावतोय. त्यात त्यांना सगळ्यांसमोर चॅलेंजींग कपडे घालून हजर लावण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. म्हणून त्याने स्त्रियांचे कपडे घातले होते.
अजिंक्यचा हा लूक बघून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला. काहींनी त्याचं कौतुक केलं. तर काहींनी त्याच्यावर टीकाही केली.
पॉवर ऑफ पाच वेबसिरीजमधील अभिनेता आदित्य अरोराने सुद्धा यावेळी मुलींच्या वेशात हजेरी लावली होती.
" हा अनुभव सशक्त आणि समृद्ध करणार होता" असं अजिंक्यने पोस्टमध्ये म्हटलं.
अजिंक्यच्या विठू माऊली, मन उडू उडू झालं आणि अबोल प्रीतीची अबोल कहाणी या मालिका गाजल्या.