kimaya narayan
सोशल मीडियावरील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आणि अभिनेता जय दुधाणेने प्रेमाची कबुली देत साखरपुडा केल्याचं जाहीर केलं.
एमटीव्ही स्प्लिस्वीलामुळे जयला प्रसिद्धी मिळाली. त्याचं व्यक्तिमत्त्व अनेकांना आवडलं.
त्यानंतर जय बिग बॉस मराठी सीजन 3 मध्येही सहभागी झाला. त्याचा परफॉर्मन्स अनेकांना आवडला. सीजन 3चा तो रनर अप ठरला तर विशाल निकम विजेता ठरला.
नुकतीच जयने सोशल मीडियावर शेअर करत त्याचं रिलेशनशिप जाहीर केलं. गर्लफ्रेंडला रिंग देत त्याने लग्नसाठी प्रपोज केलं.
जयच्या गर्लफ्रेंडचं नाव हर्षला पाटील आहे. गेली बरीच वर्षं ते डेट करत आहेत.
लवकरच हे दोघं लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची तारीख फक्त मला माहित आहे असं जयचा मित्र आणि गायक उत्कर्ष शिंदेने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं.
हर्षलासुद्धा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. ती सोशल मीडियावर फॅशनशी संबंधित पोस्ट शेअर करत असते.
जयने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताच अनेकांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.