kimaya narayan
हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आघाडीचा अभिनेता म्हणजे नकुल मेहता. सोशल मीडियावर त्याचं फॅन फॉलोईंग खूप आहे.
नकुलचं लहानपण मुंबईत गेलं आहे. पण तो राजघराण्याशी संबंधित आहे. त्याचे खापर पणजोबा मेवाडच्या सैन्यात कमांडर होते.
नकुलने मुंबई विद्यापीठातून एम कॉम केलं आहे. तसंच त्याने संदीप सोपारकरकडे नृत्याचं शिक्षण घेतलं आहे.
मेवाडचा महाराज पृथ्वीराज चौहान यांच्या घराण्याशी नकुलचा संबंध आहे. मेवाडच्या राजपूत चौहान घराण्याशी तिचा संबंध आहे.
नकुलला लहानपणापासून अभिनयक्षेत्रातच काम करायचं होतं. अभिमानी या सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर 2012 मध्ये त्याने मालिकाविश्वात पदार्पण केलं.
प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा, इष्कबाज, बडे अच्छे लगते है या त्याच्या मालिका खूप गाजल्या.
नकुलने त्याच्या लहानपणीची मैत्रीण जानकी पारेखशी लग्न केलं आहे. त्यांना सुफी नावाचा मुलगा आहे.