kimaya narayan
अभिनेत्री सागरिका घाटगे ही कोल्हापूरच्या कागल राजघराण्याची वंशज आहे हे सगळ्यांना माहितीये. इतकंच नाही ती राजर्षी शाहू महाराजांचीही वंशज आहे. पण तिच्याबरोबरच असेही काही बॉलिवूड कलाकार आहेत जे राजघराण्याशी संबंधित आहेत.
अभिनेता आमिर खानची एक्स पत्नी आणि दिग्दर्शिका किरण राव ही राजघराण्याशी संबंधित आहे. वनपर्थीचे राजा जे रामेश्वर राव यांची ती नात आहे.
अभिनेत्री अदिती राव हैदरी ही सुद्धा राजघराण्याशी संबंधित आहे. वनपर्थीचे राजा जे रामेश्वर राव यांची अदितीसुद्धा नात आहे. इतकंच नाही तर किरण आणि अदिती मामेबहिणी आहेत.
मैने प्यार किया सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री ही सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याची राजकुमारी आहे. भाग्यश्रीचे वडील विजय सिंहराव माधवराव पटवर्धन हे सांगलीचे राजे आहेत.
अभिनेते नसिरुद्दीन शाह हे सरदाना घराण्याचे वंशज आहे. त्यांचे खापरपणजोबा सरदाना घराण्याचे नवाब होते.
अभिनेत्री मनीषा कोईराला ही सुद्धा नेपाळची राजकुमारी आहे. कोईराला या राजघराण्याशी ती संबंधित आहे तर तिचे घरातील लोक राजकारणात आहेत.
अभिनेत्री रिया सेन ही सुद्धा राजघराण्याशी संबंधित आहे. तिचं खरं आडनाव वर्मा आहे. तिचे वडील भरत देव वर्मा आहेत जे त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित असून तर बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची मुलगी इंदिरा तिची पणजी आहे.
अभिनेत्री सोनल चौहान ही सुद्धा रजपूत घराण्याशी संबधीत आहे.
तर बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खान हा पतौडी घराण्याशी संबंधित आहे आणि आता तो पतौडीचा नवाबही आहे.