Apurva Kulkarni
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केलाय.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला त्याच्या कॉलेजच्या काळात एका मुलीवर क्रश होता, पण तिने त्याला नकार दिला.
एका मुलाखतीत नवाजुद्दीनने सांगितलं की, 'गावात टीव्ही आला होता. आणि तिला कृषी दर्शन खूप आवडायचं. मी तिला प्रपोज केलं होतं परंतु तिने नकार दिलेला.'
'मला तिला भेटायची खूप इच्छा असायची पण तिला कृषी दर्शन पहायचं असायचं त्यावेळी मी तिला बोललो होतो. एक दिवस मी तुला टीव्हीवर येऊन दाखवणार'
त्या नकारामुळे नवाजुद्दीनला स्वतःमध्ये काहीतरी सिद्ध करायचं ठरवलं.
आर्थिक स्थिती वाईट होती, जवळपास दीड महिना फक्त बिस्किट खाऊन दिवस काढले.
अनुराग कश्यपच्या 'गँग्स ऑफ वासेपुर'ने त्याला खरी प्रसिद्धी दिली.
संघर्षातून पुढे येत नवाजुद्दीन आज 160 कोटी संपत्तीचा मालक आहे.
क्रशने नकार दिला नसता, तर कदाचित आजचा ‘नवाज’ जगासमोर नसता!