kimaya narayan
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेता रोहित माने घराघरात पोहोचला. त्याने विविध स्किट्समधून भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली.
गेल्या वर्षी रोहितने मुंबईत स्वतःच हक्काचं घर विकत घेतलं. नुकतीच त्याने त्याची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली.
रोहित मूळचा साताऱ्याचा आहे. वडिलांच्या नोकरीमुळे ते सतत भाड्याच्या घरात राहत होते. त्यामुळे पहिल्यांदा स्वतःच घर खरेदी करण्याचा आनंद व्यक्त केला.
रोहितने पहिल्यांदाच सोशल मीडियावर पहिल्यांदाच शेअर केली. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याची पत्नी श्रद्धाही दिसतेय.
पांढरा आणि निळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्ये त्यांनी त्यांचं घर सजवलं आहे.
स्वयंपाकघरात हलका निळा रंग आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन करण्यात आलं आहे. वेस्टर्न पद्धतीने हे स्वयंपाक घर सजवण्यात आलं आहे.
त्याच्या घरातील देवघरही आकर्षक आहे. गणपती आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती लक्ष वेधून घेतेय.
बेडरूममध्ये निळ्या रंगातील पेस्टल शेड आणि पांढऱ्या रंगाचं सुंदर कॉम्बिनेशन करण्यात आलं आहे.
या घरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ही सगळी सजावट रोहितच्या पत्नीने केली आहे.