कुणीही सामान्य व्यक्ती नाही तर 'या' दिग्गज अभिनेत्रीकडून सचिन पिळगावकरांनी गिरवलेत उर्दूचे धडे

kimaya narayan

सचिन पिळगावकर

मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर कायमच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात.

Sachin Pilgaonkar

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व

उत्तम दिग्दर्शक, निर्माते, डान्सर आणि गायक म्ह्णून सचिन यांची ओळख आहे. याबरोबरच ते उत्तम शायरही आहेत. उर्दू भाषेचं त्यांना ज्ञान आहे.

Sachin Pilgaonkar

उर्दूत विचार करतो

नुकतंच त्यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केलं की,"मराठी जरी माझी मातृभाषा असली तरीही मी विचार उर्दूमध्ये करतो. रात्री झोपताना किंवा झोपेतही मी उर्दूमध्ये बोलू शकतो. "

Sachin Pilgaonkar

ट्रोलिंग

सचिन यांच्या वक्तव्यामुळे काहींनी त्यांच्यावर टीका केलीये. पण तुम्हाला माहितीये सचिन यांचा उर्दूचा अभ्यास खरंच खूप मोठा आहे.

Sachin Pilgaonkar

मीनाकुमारी

सचिन कोणत्याही सामान्य व्यक्तीकडून नाही तर दिग्गज अभिनेत्री मीनाकुमारी यांच्याकडून उर्दू शिकले आहेत. ते लहान असताना स्वतः मीनाकुमारी यांनीच त्यांना ही भाषा शिकवली.

Sachin Pilgaonkar

मंझली दीदी

सचिन हे लहान असताना मंझली दीदी या सिनेमात काम करत होते. त्यांच्याबरोबर मीना कुमारी मुख्य भूमिकेत होत्या. त्यावेळी सचिन यांचे मराठी मिश्रित उच्चार ऐकून त्यांनी स्वतःच त्यांना उर्दू शिकवण्याचा प्रस्ताव त्यांच्या पालकांजवळ ठेवला.

Sachin Pilgaonkar

उर्दूचे धडे आणि आवड

मीनाकुमारी या स्वतः उर्दूच्या उत्तम जाणकार होत्या. याशिवाय त्या शेरोशायरीही करायच्या. त्यांची ही आवड सर्वश्रुत होती.

Sachin Pilgaonkar

शिकवणी

सचिन यांच्या पालकांकडे मीनाकुमारींनी आठवड्यातून चार दिवस उर्दूच्या शिकवणीसाठीसचिन याना त्यांच्या घरी पाठवायचा प्रस्ताव ठेवला. तो त्यांनी मान्य केला. इथूनच सचिन उर्दू शिकले.

Sachin Pilgaonkar

आठवणी

सचिन यांनी या आठवणी त्यांच्या 'हाच माझा मार्ग एकला' या आत्मचरित्रात लिहिल्या आहेत आणि मीनाकुमारी यांचं ऋणी असल्याचं म्हटलं आहे.

Sachin Pilgaonkar

'या' मूलांकांच्या लोकांना नोकरीत मिळतं पटापट प्रोमोशन, बॉसही असतो यांच्यावर असतो खुश !

Mulank 4

येथे क्लिक करा