NUMEROLOGY : 'या' मूलांकाच्या लोकांना नोकरीत मिळतं पटापट प्रोमोशन, बॉसही असतो यांच्यावर असतो खुश !

kimaya narayan

अंकशास्त्र

अंकशास्त्र ही एक ज्योतिषशास्त्राप्रमाणेच भविष्य आणि स्वभाव जाणून घेण्याची महत्त्वाची शाखा आहे. तुमची जन्मतारीख तुमच्या अनेक दडलेल्या क्षमता उघड करते.

ऑफिसमध्ये वर्चस्व

आज जाणून घेऊया अशा मूलांकाविषयी जे त्याच्या क्षमतेमुळे लवकर प्रोमोशन मिळवतात आणि बॉसही त्यांच्यावर खुश असतो.

मूलांक 5

हा मूलांक आहे 5. कोणत्याही महिन्याच्या 5,14 आणि 23 तारखांना ज्यांचा जन्म झालेला असतो त्यांचा मूलांक 5 असतो. या मूलांकाचा स्वामी बुध आहे.

खासियत

या मूलांकाची खासियत म्हणजे सतत नवीन गोष्टी शिकत राहण्याची वृत्ती. त्यामुळे कोणतंही नवीन तंत्र ते लवकर समजून घेऊ शकतात आणि त्याचा त्यांना भविष्यात फायदा होतो. यांच्यात उत्तम संवादकौशल्य असतं.

उत्तम मित्र

या मूलांकाचे लोक उत्तम मित्र होतात त्यामुळे ते लोकांना आकर्षित करतात आणि एखाद्याकडून ते काम करून घेण्यात माहीर असतात. त्यामुळे हे एक उत्तम नेतृत्व करणारी व्यक्ती असतात.

बुद्धिमान

हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. हे लोक उत्तम मॅनेजर, मॅजिस्ट्रेट, डॉक्टर, पत्रकार आणि ज्योतिषी म्हणून सिद्ध होतात. त्यामुळे यांना संपत्तीबरोबर प्रसिद्धीही मिळते.

छंद

या लोकांना फिरायला आवडतं. नवीन संस्कृती जाणून घेणं हे पसंत करतात. नवीन मित्र बनवणं यांना आवडतं.

यशस्वी

त्यांच्या या स्वभावामुळे ते लवकर यशस्वी होतात त्यामुळेच त्यांना लवकर प्रोमोशन, पगारवाढ मिळते. याशिवाय ते लवकरच यशस्वी व्यावसायिकही बनतात.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

खतरनाक सुना असतात 'या' मूलांकाच्या मुली ; सासूशी पटत नाही पण नवऱ्याचं भाग्य बदलतात

येथे क्लिक करा