kimaya narayan
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचं वैयक्तिक आयुष्य कायम वादग्रस्त राहीलं. अफेअर्स ते गुन्हेगारी अशा गोष्टींमध्ये त्याचं नाव ओढलं गेलं.
संजयचं पर्सनल लाईफ कधीच स्थिर नव्हतं. त्याची अनेक अफेअर्स झाली. तितकीच त्याची लग्नही झाली.
संजयचं पहिलं लग्न ऋचा शर्माशी 1987 मध्ये झालं. पहिल्या वर्षातच त्यांना मुलगी झाली. जिचं नाव त्यांनी त्रिशाला ठेवलं.
त्रिशालाच्या जन्मानंतर ऋचाला ब्रेन ट्युमरचं निदान झालं. त्यातच त्यांची भांडण वाढू लागली आणि त्यांचा घटस्फोट झाला. त्याच्या घटस्फोटाचं कारण त्याची अफेअर असल्याचं म्हटलं गेलं.
संजयने मुवी मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या घटस्फोटाचा खरं कारण सांगितलं. ऋचाच्या आई-वडिलांचा त्यांच्या संसारात खूप हस्तक्षेप होता तर तिच्या बहिणीने त्यांच्यात भांडणं लावली असा खुलासा त्याने केला.
ऋचा आजारी असताना माधुरी दीक्षितबरोबर अफेअर असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळेच त्यांचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं गेलं.
संजय आणि ऋचाची मुलगी त्रिशाला अमेरिकेत राहते आणि ती कधीतरी वडिलांना भेटण्यासाठी मुंबईत येते.