kimaya narayan
बॉलिवूडचे महानायक म्हणून अमिताभ बच्चन यांची ओळख आहे. त्याच्या अभिनयाचे आजही अनेक फॅन्स आहेत.
पण अमिताभ बच्चन यांचं तरुणवयातील वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहील. अनेक तरुणींना त्यांनी डेट केलं. जाणून घेऊया अमिताभ यांच्या गर्लफ्रेंडविषयी.
अमिताभ यांची पहिली गर्लफ्रेंड माया नावाची तरुणी होती जी ब्रिटिश एअरवेजमध्ये हवाईसुंदरी म्हणून कामाला होती. अमिताभ तिच्या प्रेमात वेडे झाले होते पण इतक्या मॉडर्न मुलीला आई स्वीकारणार नाही म्हणून त्यांनी हे नातं मोडलं.
बॉलिवूडमध्ये आल्यावर अमिताभ यांची दोस्ती जया बच्चन यांच्याशी झाली. पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नही केलं. पण लग्नानंतरच आयुष्य वादग्रस्त ठरलं होतं पण त्यांनी वेळीच संसार सावरला.
अमिताभ आणि जया यांचा संसार उध्वस्त होता होता राहिला ते रेखाबरोबरच्या कथित प्रेमप्रकरणामुळे. जया यांच्याशी लग्न झालं असतानाच अमिताभ बच्चन रेखा यांच्या प्रेमात होते पण पुढे त्यांच्या अपघातावेळी जया यांनी केलेली सेवा पाहून त्यांनी हे नातं मोडलं.
अमिताभ यांचं नाव परवीन बाबी यांच्याशीही जोडलं गेलं. जया त्यांच्याआधी अमिताभ परवीन यांना डेट करत होते असं म्हटलं जायचं पण यावर त्या दोघांनीही कधीची भाष्य केलं नाही.
परवीन यांनी अमिताभ यांच्यावर त्यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे त्यांचे संबंध खराब झाले होते.