Anuradha Vipat
नुकतंच अभिनेता सिद्धार्थ जाधवने आईचा एक किस्सा सांगितला.
सिद्धार्थ म्हणाला, आई विषयी मी खूप बोलतो. ही गोष्ट मला नेहमी सांगावीशी वाटेल. याचा मला अभिमान वाटतो. मी निर्व्यसनी आहे. दारू, सिगारेट पित नाही. याच मुख्य कारण माझी आई आहे.
पुढे सिद्धार्थ म्हणाला, “जेव्हा आम्ही शिवडीला राहत होतो. तेव्हा आम्ही एक नाटक केलं होतं. त्यात दारू पिणाऱ्याची भूमिका केली होती.
पुढे सिद्धार्थ म्हणाला, त्यावेळेस नाटकाचा प्रयोग झाल्यानंतर आई खूप घाबरली होती. माझा पोरगा दारू पिऊ आला की काय, असं वाटलं.
पुढे सिद्धार्थ म्हणाला, तेव्हा तिने मला सांगितलं होतं, दारू, सिगारेट प्यायची असेल तर माझा चेहरा डोळ्यासमोर आण.
पुढे सिद्धार्थ म्हणाला, तसंच जेव्हा नकारात्मक विचार डोक्यात येत असतील तेव्हा आमचा चेहरा डोळ्यासमोर आण.
पुढे सिद्धार्थ जाधव म्हणाला, “आपल्या आयुष्यात सर्वात निस्वार्थी नातं आई-वडिलांचं आहे.