kimaya narayan
बॉलिवूडमधील 63 वर्षीय अभिनेत्याने खूप स्ट्रगल करत स्वतःच साम्राज्य उभं केलं आहे. आज एक यशस्वी अभिनेता म्हणून ओळख असलेला हा कलाकार आज अनेक हॉटेल्सचा मालक आहे.
हा अभिनेता आहे सुनील शेट्टी. नव्वदच्या दशकातील लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं.
अतिशय लोकप्रिय असलेल्या अभिनेत्याने सगळ्यांचं त्याच्या माणुसकीनेही मन जिंकलं. पण सुनील अतिशय सामान्य कुटूंबातून आला आहे. हे यश मिळवण्यासाठी त्याला खूप मेहनत करावी लागली.
सुनीलचे वडील हे एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करायचे. त्यांच्या पगारावर सुनीलचं घर चालायचं. पण पुढे सुनीलने हेच हॉटेल विकत घेतलं.
त्याने या हॉटेलची बिल्डिंग विकत घेतली. त्याचे वडील वीरप्पा या हॉटेलमध्ये काम करायचे. १ ९ ९ ३ मध्ये त्याने हे हॉटेल विकत घेतलं होतं जे वरळीमधील फोर सिजन्सच्या हॉटेलच्या बाजूला आहे.
फक्त अभिनयच नाही तर सुनील एक व्यावसायिक आहे. पॉपकॉर्न एंटरटेनमेंट हे त्याच्या निर्मिती संस्थेचं नाव आहे. याशिवाय अनेक रिसॉर्ट आणि हॉटेलचा तो मालक आहे.
सुनीलची प्रॉपर्टी 125 करोड रुपये आहे. याशिवाय त्याच लोणावळ्यामधे फार्महाऊससुद्धा आहे.