kimaya narayan
अभिनेत्री शिवाली परबने कमी कालावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अतिशय सामान्य घरातून आलेल्या शिवालीने खूप मेहनतीने स्थान निर्माण केलं आहे.
एका सामान्य कुटूंबात शिवालीचा जन्म झाला. तिचे वडील रिक्षाचालक होते. त्यामुळे लहान असल्यापासूनच घरातील परिस्थिती अतिशय सामान्य होती.
लहान वयातच शिवालीने नोकरी शोधण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी शाळेत ती नृत्यस्पर्धांमध्ये भाग घ्यायची. कॉलेजमध्ये असताना तिने एकांकिकेची ऑडिशन दिली. त्यात ती सिलेक्ट झाली आणि त्यावेळीच तिला नोकरीची ऑफर आली.
पण घरच्यांच्या सपोर्टमुळे तिने नोकरी न करता एकांकिका करण्यास सुरुवात केली. याचदरम्यान एका इव्हेंटमध्ये काम करताना नम्रता आणि अरुण कदम यांनी शिवालीची ऑडिशन पहिली आणि त्यांनी तिचं कौतुक केलं.
त्याचवेळी ती एका सिनेमासाठी असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम करत असताना तिला हास्यजत्रेची ऑफर आली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेलं नाही.
महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कमाल परफॉर्मन्समुळे शिवालीने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यामुळे तिला सिनेमांच्या ऑफर्सही आल्या.
शिवाली आगामी काळात अनेक सिनेमांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.