Anuradha Vipat
अनेक चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता विक्रांत मेस्सी
विक्रांतने त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला.
विक्रांत अभिनयातून ब्रेक घेत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
त्यावर आता विक्रांतने स्पष्टीकरण दिलं आहे.
गेल्या काही वर्षांपासून केलेल्या सततच्या कामामुळे शारीरिक, मानसिक तणाव येऊन ब्रेकची फार गरज असल्याचं त्याने म्हटल आहे
विक्रांत म्हणाला, “मी निवृत्त होत नाहीये. मी खूप थकलोय. मला एका मोठ्या ब्रेकची खूप गरज आहे.
पुढे विक्रांत म्हणाला की ,मला घराची खूप आठवण येते आणि आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. लोकांनी माझ्या पोस्टचा वेगळाच अर्थ काढला