Anuradha Vipat
प्रसिद्ध अभिनेता विक्रांत मेस्सीने अभिनयातून ब्रेक का घेतला याचं खरं कारण सांगितलं आहे.
अभिनयातून ब्रेक घेण्याची पोस्ट त्याने कोणत्यातरी दबावाखाली केली असल्याचं म्हटलं आहे.
आता विक्रांतने व्हायरल पोस्टवर स्पष्टीकरण दिल्यानंतर त्याच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले आहे.
विक्रांत मेस्सीने म्हटलं की, ज्या आयुष्याचे मी नेहमी स्वप्न पाहिले होते, ते मला शेवटी मिळाले, म्हणून मला वाटले की आता ती जगण्याची वेळ आली आहे जसं मला हवं होतं
पुढे विक्रांत मेस्सीने म्हटलं की, मला ब्रेक घ्यायचा होता, कारण दिवसाच्या शेवटी, सर्वकाही क्षणिक आहे समजलं.
तसेच विक्रांतने हेही स्पष्ट केलं की, तो त्याच्या पत्नी आणि मुलासोबत वेळ घालवू शकत नाही, ज्यामुळे त्याला हा ब्रेक हवा होता.
विक्रांतचा यार जिगरी आणि आँखों की गुस्ताखियाँ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.