Anuradha Vipat
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी मालिकेतील एका सहकलाकारासाठी शेअर केलेली पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी वीराबरोबर एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे
व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या यांनी लिहिले आहे की, आम्ही या पात्रासाठी एकत्र शेवटचे एकदा काम करत आहोत, हे माझ्यासाठी खूप खास आहे.
पुढे त्यांनी मालिकेत रीमाची भूमिका साकारणारी बालकलाकार वीरा नेवालेला टॅग करत लिहिले, “माझी क्युटी पाय.
ऐश्वर्या यांनी पुढे लिहिले आहे की, अतिशय उत्तम कलाकार, खूप छान वागणारी मुलगी, लव्ह यू. खूप मोठी हो. तू खूप गोड आहेस. मी तुझ्याबरोबर सीन्स शूट करणे खूप मीस करेन. थँक्यू”, असे म्हणत ऐश्वर्या नारकर यांनी हार्ट इमोजी शेअर केली आहे.
या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर या शतग्रीवच्या पेहरावात दिसत आहेत.
या व्हिडीओवर त्यांनी “शतग्रीव आणि विरोचक वन लास्ट टाईम” असे लिहिले आहे.