Pranali Kodre
राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू आणि अभिनेत्री प्राची तेहलानच्या मते योग्य आहाराशिवाय फिटनेस मिळूच शकत नाही.
प्राचीने तिच्या फिटनेसमागील योग्य आहाराचे महत्त्व सांगितले आहे. तिने फिटनेससाठी आहाराचे महत्त्व सांगितले, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
प्राची म्हणते, माझ्यासाठी सर्वांत प्रभावी आहार म्हणजे जंक फूड आणि हानिकारक कर्बोदकांपासून पूर्णतः दूर राहणे आणि प्रथिनांचे प्रमाण जास्त असलेल्या आहाराचे अनुसरण करणे.
वजन कमी करण्यासाठी कमी आणि योग्य खाणे हे फार महत्त्वाचे आहे. ७० टक्के डाएट आणि ३० टक्के व्यायाम हे मला फिटनेसचे गणित वाटते.
फिट राहण्यासाठी महागडे जिम, डाएट प्लॅन किंवा उपकरणांची गरज नाही. आरोग्य ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि ती अगदी मर्यादित बजेटमध्येही पाळता येते, असंही प्राची म्हणते.
फिटनेस म्हणजे एका दिवसात मिळणारा परिणाम नाही.तो म्हणजे दररोज स्वतःसाठी दिलेला वेळ, घेतलेली जबाबदारी आणि एक शिस्तबद्ध जीवनशैली आहे.
आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि ती मिळवण्यासाठी फक्त थोडा संयम, वेळापत्रक आणि या सर्व गोष्टी मनापासून करणे गरजेचे आहे.