Pranali Kodre
तीळ अनेकांच्या घरात नेहमीच वापरले जातात.
सॅलड, थालिपीठ, सूप, ओली/सुकी चटणी, मुखवास इत्यादी अनेक पदार्थांत तीळाचा वापर केला जातो.
तीळतेल खाण्यासाठी व औषधासाठी उपयुक्त असून आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा समावेश होतो. मालिशीसाठी उपयुक्त असल्याने शरीराला बळकटी मिळते.
तिळात प्रथिने, कॅल्शिअम, लोह, जस्त, पोटॅशिअम, फॉस्फरस आणि ‘क’ जीवनसत्त्व मुबलक असतात.
डाळी, उसळी, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहार यासोबत रोजच्या आहारात तीळ असतील, तर स्त्रियांसाठी सोपा व उत्तम टॉनिक आहे. काळे तीळ + पांढरे तीळ (१:३ या प्रमाणात) एकत्र करून रोज दोन चहाचे चमचे चावून चावून खावेत.
दातांच्या तक्रारी असतील, तर १-१ चमचा पूड सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर घ्यावी.
ऐंशी-पंचाऐंशी टक्के स्त्रियांमध्ये ॲनिमियाची तक्रार आढळून येते. अशा वेळी काळे तीळ अधिक उपयुक्त ठरतात. काळ्या तिळात लोह व तांबे रक्ताल्पतेवर मात करून लाल रक्तपेशी मजबूत करतात.
तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असते, जे हाडांच्या मजबुतीसाठी अत्यावश्यक असते.