kimaya narayan
बॉलिवूडची एक अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ही अभिनेत्री आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा प्रसिद्ध आहे.
ही अभिनेत्री आहे दिया मिर्झा आहे. 2001 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या अभिनेत्रीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली.
'रहना है तेरे दिल में' हा तिचा पहिला सिनेमा आहे. आर माधवनबरोबर तिने या सिनेमात काम केलं होतं.
पण दियाचं वैयक्तिक आयुष्य चर्चेत राहिलं आहे. दिल्याचे वडील हे जर्मन होते. त्यांचं नाव फ्रॅंक हॅन्ड्रीच आहे. ते काही वर्षांपूर्वी वारले.
दियाच्या आईचं नाव दीपा आहे. त्या इंटिरिअर डिझायनर आहेत. दिया साडेचार वर्षांची असताना त्यांचा घटस्फोट झाला.
दियाच्या आईने अहमद मिर्झा या व्यक्तीशी लग्न केलं. त्यांनी तिचा उत्तम सांभाळ केला. त्यामुळे दियाने मिर्झा हे आडनाव वापरायला सुरुवात केली. त्यांचं 2003 मध्ये निधन झालं.
"आमच्यामध्ये एक सुंदर नातं निर्माण झालं. ज्याची सुरुवात मैत्रीने झाली. त्यांच्याबरोबर मी आयुष्यातील बराच काळ एकत्र घालवला आहे." असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.
माधुरीमुळे नाही या कारणामुळे मोडलं संजय दत्तचं पहिलं लग्न