Anuradha Vipat
हृता दुर्गुळेने कधी दुर्वा, कधी वैदेही तर कधी दीपू म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
आता हृताने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे जी खूप चर्चेत आली आहे.
पोस्टमध्ये हृताने लिहिलं आहे, “ती – तू मला आधी का नाही भेटलास?…तो – तुझी वाट बघण्यात वेळ गेला…वेड लागणार नसेल तर प्रेम करण्यात काही गंमत नाही…घेऊन येतोय त्याची आणि तिची क्रेझी लव्हस्टोरी.
पुढे पोस्टमध्ये हृताने लिहिलं आहे, फिल्मींग नाउ…तुमच्या आणि आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही दोघांनी एकत्र काम करून दाखवलं. लवकरच भेटूया चित्रपटगृहात...
असं कॅप्शन लिहित हृताने लोकप्रिय मराठी ललित प्रभाकरबरोबर रोमँटिक फोटो शेअर केला आहे.
हृताने शेअर केलेल्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे
आता हृताच्या लवकरच ललित प्रभाकरबरोबर नवा चित्रपट येत असल्याचं समोर आलं आहे