Anuradha Vipat
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मोनिका दबडेने चाहत्यांना गुडन्यूज देत वैयक्तिक आयुष्यात ती लवकरच आई होणार आहे असं जाहीर केलं होतं.
आता मोनिकाने तिच्या सर्व चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे.
सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने नवीन गाडी खरेदी केल्याचं सांगितलं आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत मोनिका अस्मिता हे पात्र साकारत आहे.
‘स्वप्नपूर्ती आणि तयारी’ असं कॅप्शन देत मोनिकाने नव्या गाडीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नव्या गाडीबरोबर मोनिकासह तिचा पती चिन्मय कुलकर्णी यानेही छानसे फोटो काढले आहेत.
शेअर केलेल्या पोस्टला दिलेल्या हॅशटॅगवरुन अभिनेत्रीने टाटा Nexon ही गाडी खरेदी केल्याचं स्पष्ट होत आहे.