kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं काल 16 ऑगस्टला निधन झालं. काही दिवस त्यांच्यावर आजारावर उपचार सुरु होते.
मृत्यूसमयी त्यांचं वय 69 वर्षं होतं. त्यांच्या निधनाने मराठी इंडस्ट्रीला धक्का बसला.
त्या ठरलं तर मग या स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करत होत्या. या मालिकेत त्यांनी पूर्णा सुभेदार म्हणजेच पूर्णाईची भूमिका साकारली होती.
या मालिकेत सायली ही मुख्य भूमिका जुई गडकरीशी सुद्धा त्यांचं नातं खास होतं. ज्योती यांच्या निधनाने जुईला खूप मोठा धक्का बसला.
सोशल मीडियावर जुईने निधनाची बातमी समजल्यानंतर तू फसवलंस आजी अशी पोस्ट शेअर केली होती.
आज ज्योती यांच्यावर पुण्यामध्ये अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांचे अनेक सहकलाकार, कुटूंबीय आणि बरेच हितचिंतक उपस्थित होते.
जुई गडकरीही ज्योती यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होती.
ज्योती यांचे अंत्यदर्शन घेतल्यावर जुई अतिशय भावूक झाली. सोशल मीडियावर चर्चेत आलेल्या व्हिडिओमध्ये जुई हमसून हमसून रडताना दिसतेय. जुईची अवस्था बघून चाहते अतिशय भावूक झाले.