kimaya narayan
बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केलेल्या एक मराठी अभिनेत्री म्हणजे कानन कौशल. जय संतोषी माँ या सिनेमामुळे त्यांना ओळखलं जातं.
कानन कौशल या मराठी अभिनेत्री आहेत. पण याबरोबरच त्यांनी इतर भाषिक सिनेमांमध्येही काम केलं आहे. त्यांचा जन्म बडोद्यामध्ये झाला होता.
कानन कौशल यांचं खरं नाव इंदुमती शेठ असं होतं. तर त्यांनी शशिकांत पैंगणकर यांच्याशी लग्न केलं.
कानन यांचा 1975 साली रिलीज झालेला जय संतोषी माँ हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमात त्यांनी सत्यवती ही भूमिका साकारली. या सिनेमाचा निर्माता कर्जबाजारी झाला पण या सिनेमाने छप्परफ़ाड कमाई केली.
जय संतोषी माँ सिनेमामुळे त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. या सिनेमांमुळे त्यांना अनेक बड्या सिनेमांच्या ऑफर्स येतील असं सगळ्यांना वाटलं होतं पण तस झालं नाही.
सिनेमा हिट होऊनही कारण यांची उपेक्षाच झाली. पुढे त्यांनी चरित्र आणि पौराणिक भूमिकाच साकारल्या. माया मच्छिन्द्रा (1975), बिदाई (1974), राम भरोसे (1977), जय द्वारकाधीश (1977), जय गणेश (1978) या सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं.
कानन यांचं वय सध्या 86 आहे. सध्या त्या प्रसिद्धीपासून दूर आहेत.