बॉलिवूड अभिनेत्रींचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत असतं. यातील काही अभिनेत्रींनी घटस्फोटित व्यक्तींची निवड जोडीदार म्हणून केली आहे. कोण आहेत या अभिनेत्री जाणून घेऊया.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी अनिल कपूरचे मोठे भाऊ आणि निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. याआधी बोनी यांचं मोना शौरी यांच्याशी झालं होतं आणि त्यांना दोन मुलं होती. पण मोनाशी घटस्फोट घेत त्यांनी श्रीदेवीशी लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री करिष्मा कपूरनेसुद्धा उद्योगपती संजय कपूरशी लग्न केलं. त्यांना समायरा आणि कियान ही दोन मुले आहेत. संजय यांचं हे दुसरं लग्न होतं आणि काही वर्षांनी करिष्मानेही त्यांच्यापासून घटस्फोट घेतला.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राही घटस्फोटीत आहे. राजचं पहिलं लग्न लंडनस्थित कविता कुंद्राशी झालं होतं आणि त्यांना एक मुलगीही आहे. त्यानंतर 2009 मध्ये त्याने शिल्पाशी लग्न केलं.
अभिनेत्री करीना कपूर खाननेही सैफ अली खानशी लग्न केलं. सैफचं पहिलं लग्न अमृता सिंहशी झालं होतं आणि त्यांना सारा आणि इब्राहिम ही मुलं आहेत. 2012 मध्ये या जोडीने लग्न केलं.
अभिनेत्री विद्या बालनने सिद्धार्थ रॉय कपूरशी लग्नगाठ बांधली. सिद्धार्थचं पहिलं लग्न आरती बजाजशी झालं होतं तर दुसरं लग्न कविताशी झालं. पण या दोन्ही घटस्फोटानंतर त्याने 2014 मध्ये विद्याशी लग्न केलं.
अभिनेत्री महिमा चौधरीने बॉबी मुखर्जीशी लग्न केलं. यापूर्वीही बॉबीचं लग्न झालं होतं आणि तो दोन मुलांचा पिता होता. पण अचानक या जोडीने लग्न केलं आणि प्रेग्नेंसीची बातमी जाहीर केली.
रवीनाने अनिल थडानीशी 2004 मध्ये लग्न केलं. या आधी अनिल यांचं लग्न रवीनाची मैत्रीण नताशा सिप्पीशी झालं होतं. पण रवीना आणि अनिल यांच्या अफेअरमुळे त्यांचा डिव्होर्स झाला.
अमृता अरोराने शकील लडाकशी लग्नगाठ बांधली. शकीलचं आधी लग्न निशा राणाशी झालं होतं जी अमृताची खास मैत्रीण होती.
अभिनेत्री लारा दत्ताने टेनिसपटू महेश भूपतीशी लग्न केलं. महेशच पहिलं लग्न श्वेता जयशंकरशी झालं होतं पण लवकरच त्यांचा घटस्फोट झाला.
अभिनेत्री बिपाशा बसूनेही करण सिंह ग्रोव्हरशी लग्नगाठ बांधली. या आधी करणचे दोन घटस्फोट झाले होते. करणचं पहिलं लग्न श्रद्धा निगमशी झालं होतं तर दुसरं जेनिफर विंगेटशी झालं होतं.
अभिनेत्री राणी मुखर्जीने आदित्य चोप्रा यांच्याशी लग्न केलं. या आधी आदित्य यांचं लग्न पायल खन्नाशी झालं होतं पण 2009 मध्ये ते विभक्त झाले.