Anuradha Vipat
अभिनेत्री कविता मेढेकर यांनी नुकतीच एका यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाविषयीची माहिती सांगितली आहे
मुलाखतीत कविता मेढेकर म्हणाल्या की, मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की, मला नाटकात काम करायचं आहे.
पुढे कविता मेढेकर म्हणाल्या की,त्यावेळी माझ्या बाबांचं सरळ, स्पष्ट मत होतं की, चांगल्या घरातील मुली नाटक, सिनेमा यांत काम करीत नाही.
पुढे कविता मेढेकर म्हणाल्या की,माझं असं होतं की नाटकात काम करण्याची संधी मिळतेय करू का? बाबा नाही म्हटले आणि मी ठीक आहे असे म्हटले.
पुढे कविता मेढेकर म्हणाल्या की, पुढे मला सुदैवानं चांगली संधी मिळाली. ‘सुंदर मी होणार’सारख्या नाटकात मला काम करण्याची संधी मिळाली
पुढे कविता मेढेकर म्हणाल्या की, त्यावेळी वडिलांनी परमिशन दिली पण त्यांना मला दोन अटी घातल्या त्या म्हणजे एक पोर्टफोलिओ घेऊन कोणाच्याही ऑफिसमध्ये जायचं नाही आणि दुसरं सिगरेट आणि दारू प्यायची नाही. .