kimaya narayan
क्रिकेटविश्वातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे महेंद्रसिंह धोनी. कायमच तो काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार म्हणून धोनीचं नाव घेतलं जात. आयसीसीच्या तिन्ही वर्ल्डकप ट्रॉफी जिंकवणारा कर्णधार म्हणून विक्रम त्याच्या नावावर आहे.
धोनीची ही कारकीर्द यशस्वी असली तरीही त्याच्या करिअरच्या सुरुवातीला अफेअरच्या चर्चा खूप गाजल्या. अनेक अभिनेत्रींबरोबर धोनीचं नाव जोडलं गेलं
धोनीचं नाव अभिनेत्री दीपिका पदुकोणबरोबरही जोडलं गेलं. त्यांना अनेकदा डिनर डेटला गेलेलंही मीडियाने पाहिलं. पण ते खूप चांगले मित्र होते हे नंतर उघड झालं.
याचदरम्यान धोनीचं नाव जोडलं गेलं ते अभिनेत्री कोमल झाशी. कोमल ही साऊथ इंडियन अभिनेत्री होती. ती सुद्धा रांचीची आहे.
तिचं नाव सुरुवातीच्या काळात धोनीशी जोडलं गेलं. पण अफेअरच्या चर्चा खोट्या असल्याचं तिने स्पष्ट केलं.
त्यानंतर दिग्दर्शकावर गैरवर्तन केल्याच्या आरोपाने ती चर्चेत आली होती.
2018 मध्ये कोमलने गीत इश्क दा या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं. त्यानंतर तिने कोणताही काम केलं नाही पण सोशल मीडियावर ती सक्रिय आहे.