kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. काही ना काही कारणामुळे ती कायम चर्चेत असते.
मालिका सिनेमा आणि नाटकांमध्ये विविध भूमिका साकारत तेजश्री मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री ठरली आहे.
पण तेजश्रीची इंडस्ट्रीमधील बेस्ट फ्रेंड तुम्हाला माहितीये का ? तुम्ही शिवानी बावकरचं नाव घेताय तर थोडं थांबा. तेजश्रीची इंडस्ट्रीमधील पहिली बेस्ट फ्रेंड आहे सुरुची आडारकर.
का रे दुरावा फेम सुरुची आडारकर ही तेजश्रीची बेस्ट फ्रेंड होती. होती म्हणण्याचं कारण असं की गेला बराच काळ त्यांचे एकत्र फोटो दिसत नाहीत.
झी मराठीच्या अवॉर्ड फंक्शनला त्यांची ओळख झाली असं म्हटलं जातं. त्यानंतर त्यांची खूप घट्ट मैत्री झाली. बराच काळ त्या मुंबईत एकत्र राहत होत्या.
सोशल मीडियावर तेजश्री आणि सुरुची एकमेकींबरोबरचे अनेक फोटो शेअर करायच्या. त्यांचे फोटो चाहत्यांना खूप आवडायचे.
तेजश्री आणि सुरुची मुंबईत एकत्र राहायच्या असंही म्हटलं जातं. पण नंतर त्यांचे एकत्र फोटो दिसणं बंद झालं.
सुरुचीच्या लग्नालाही तेजश्री हजर नव्हती. त्यामुळे त्यांच्या मैत्रीत दुरावा आला अशी चर्चाही सुरु झाली.
यामागचं निश्चित कारण अजून समजू शकलं नाहीये. पण गेला बराच काळ या बेस्ट फ्रेंडच्या जोडीला एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.