kimaya narayan
लॉकडाऊनमध्ये गाजलेल्या सेक्रेड गेम्स सीजन 1मधून कुक्कु ही भूमिका खूप गाजली. गायतोंडेला गँगस्टर बनवणारी ही भूमिका अनेकांना आवडली.
ट्रान्सजेंडर असलेली ही भूमिका कुब्रा सैत या अभिनेत्रीने साकारली होती. या भूमिकेसाठी तिचं कौतुक झालं.
त्यानंतरही तिच्या बोल्ड भूमिकांमुळे चर्चेत राहिली. ट्रायल, इलिगल यांसारख्या वेबसिरीजमध्ये तिने काम केलं आहे.
नुकतीच कुब्रा चर्चेत आलीये ते तिच्या खळबळजनक खुलास्यामुळे. बॉलिवूड बबलला दिलेली तिची मुलाखत खूप गाजतेय.
या मुलाखतीत कुब्राने ती वन नाईट स्टॅन्डमधून प्रेग्नेंट राहिल्याचा खुलासा केला. यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.
प्रेग्नेंसीविषयी समजताच मी खूप घाबरले आणि एकटीनेच अबॉर्शनचा निर्णय घेतला. असं तिने यावेळी सांगितलं. " सुरुवातीला वाईट वाटलं, लाज वाटली आणि भीती वाटली, पण नंतर एक शक्ती जाणवली. मी हा स्टिरियोटाईप तोडला." असं तिने म्हटलं.
ती लवकरच या अनुभवांवर एक पुस्तक घेणार आहे असं ती म्हणाली.