लाखो करोडो नाही तर ऑस्करची ट्रॉफी बाजारात विकली तर एवढीच किंमत मिळेल ; जाणून घ्या इंटरेस्टिंग गोष्टी

kimaya narayan

ऑस्कर पुरस्कार

आज बहुप्रतीक्षित ऑस्कर पुरस्कार पार पडला. अनेक भारतीयांच्या मनात एका भारतीय सिनेमाला ऑस्कर मिळावा ही इच्छा आहे पण अजूनही ही इच्छा पूर्ण झाली नाहीये. तरीही आज जाणून घेऊया या सिनेमाविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टी.

Oscar Award Interesting Facts

सुरुवात आणि सदस्यता फी

1929 अमेरिकेत ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी त्यावेळी 5 डॉलर एंट्री फी द्यावी लागायची. अकादमी संघटनेत फिल्मी संघटनेचे सदस्य नसलेल्या लोकांना सहभागी होता येत नाही.

Oscar Award Interesting Facts

कुणी बनवली ट्रॉफी ?

ऑस्करची शानदार ट्रॉफी अमेरिकन मूर्तिकार जॉर्ज स्टॅनली यांनी बनवली आहे. ही ट्रॉफी कांस्याची असून हिच्यावर 24 कॅरेट सोन्याचं फॉर्मिंग असतं. तसंच ही ट्रॉफी 13.5 इंच लांब आणि 8.5 पाउंड म्हणजेच जवळपास 4 किलो वजनाची आहे.

Oscar Award Interesting Facts

ट्रॉफी बनवण्याची किंमत

ही एक ट्रॉफी बनवण्यास 35 हजार रुपये खर्च येतो. पण हीच ट्रॉफी कोणत्याही विजेत्याला विकता येत नाही पण विकायची असेल तर नियम आहेत.

Oscar Award Interesting Facts

नियम

जर कुणाला ही ट्रॉफी विकायची असेल तर त्यांना अकादमीला 1 डॉलर म्हणजे 87.37 रुपये तुम्हाला द्यावे लागतात. तसंच पुरस्कार मिळाल्यानंतर विजेत्यांना एक कॉन्ट्रॅक्ट सही करावा लागतो ज्यामुळे ते पुरस्कार परस्पर विकू शकत नाहीत.

Oscar Award Interesting Facts

इतकी कमी किंमत

म्हणजेच जर 400 डॉलर मेकिंग असणाऱ्या या ट्रॉफीची रिसेल किंमत फक्त 87 रुपये म्हणजे 1 डॉलर इतकीच आहे. हा अवॉर्ड अकादमी शिवाय तुम्ही इतर कुणालाही परत विकू शकत नाही.

Oscar Award Interesting Facts

भाषणाचे नियम

ऑस्कर पुरस्कार जिंकल्यानंतर विजेत्या व्यक्तीला फक्त 45 सेकंदच भाषण करता येतं. या नियमापूर्वी सगळ्यात मोठं भाषण ग्रीर गार्सन या अभिनेत्रीने मिसेज मिनीवर या सिनेमासाठी पुरस्कार मिळाल्यावर केलं होतं जे पाच मिनिटांचं होतं.

Oscar Award Interesting Facts

विजेत्यांची नावे सील

ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची नावे ही नेहमी लिफाफ्यात सीलबंद असतात. त्यामुळे स्टेजवरील मान्यवराशिवाय ती इतर कुणालाही माहित नसतात.

Oscar Award Interesting Facts
मिकाचे बिपाशावर आरोप - येथे क्लिक करा